-: प्रस्तावना :-  

        ग्रामीण भागातील मुला-मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी त्यांच्या उन्नती साठी आणि ग्रामीण भागामध्ये जाऊन आरोग्य विषयक सेवा पुरवणे तसेच आरोग्याबरोबर सर्वांगीण विकास व्हावा या मुख्य उद्देशाने संजीवन मेडिकल एज्युकेशन अँन्ड सोशल फाउंडेशन या संस्थेची स्थापना २०१० साली झाली . संस्थेची नोंदणी सहाय्यक निबंधकांकडे आणि धर्मादाय आयुक्तांकडे झालेली आहे .
                 सन २०१०- ११ मध्ये संस्थेने विविध स्वयात्त पॅरामेडिकल कोर्सेस राबविले. गुणवत्ता वाढविण्यासाठी संस्थेने २०११-१२ मध्ये महाराष्ट्र शासन – महाराष्ट्र राज्य व्यवसाय शिक्षण परीक्षा मंडळ, मुंबई यांचे प्रमाणपत्र अभ्यासक्रम राबविण्याचे ठरवले व पॅरामेडीकल गटातील शासनमान्य अभ्यासक्रम “वार्ड असिस्टंट” (कोर्स कोड-२०११०१) या अभ्यासक्रमाची मान्यता संस्थेला मिळाली. संस्थेमधून सदर अभ्यासक्रम पूर्ण केलेले विद्यार्थी खेड ,आंबेगाव व जुन्नर तालुक्यातील विविध रूग्णालयांमध्ये कार्यरत आहेत. अभ्यासक्रमादरम्यान मिळालेल्या उत्तम प्रशिक्षणामुळे डॉक्टर आणि रुग्ण यांच्या प्रशंसेस प्राप्त झाले आहेत .
                येणाऱ्या काळात भारत सरकार- श्रम व रोजगार मंत्रालय (एस .डी .आय .एस .) योजने अंतर्गत मेडिकल व नर्सिंग सेक्टरमधील अनुक्रमे बेडसाईड असिस्टंट, बेसिक अॅनॉटॉमी अँन्ड फिजीओलॉजी, मिडवाइफरी असिस्टंट, ओपरेशन थिएटर टेक्निशिअन, फार्मसी असिस्टंट, पॅथॉलॉजी लॅब असिस्टंट हे कोर्सेस राबवून ग्रामीण भागात कुशल आरोग्य सेवक घडविण्याचे संस्थेचे उदिष्ट आहे .
                 संस्थेने आजवर मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, रक्तदान शिबिरे, २४ तास रुग्णवाहिका सेवा , आरोग्य विषयक जनजागृती कार्यक्रम तसेच मोफत आरोग्य सेवक प्रशिक्षण असे विविध प्रकारचे सामाजिक उपक्रम राबविलेले आहेत .
                संस्था आंबेगाव तालुका व्यतिरिक्त खेड, जुन्नर, शिरूर, मावळ व पारनेर तालुक्यामध्ये तेथील आपल्या प्रभावी कार्याने संपूर्ण पुणे जिल्यामध्ये ओळखली जाते. ही संस्था विशेषत: आरोग्याबरोबर सर्वांगीण विकास झाला पाहिजे या दृष्टीने समाजाभिमुख कार्य करते.

 

  -: संस्थेची कार्यकारणी :-  

तज्ञ संचालक
डॉ. हर्षद शेटे

संस्थापक अध्यक्ष
श्री. ज्ञानेश्वर भांगे
उपाध्यक्ष
श्री.दिनेश बाणखेले
सचिव
सौ. सुनिता भांगे
खजिनदार
श्रीमती. सुनिता पठारे
संचालक
डॉ. कल्पेश शेटे
डॉ. नवनाथ लोंढे
डॉ. रियाज इनामदार
डॉ. जीवन लोंढे
श्री. मंगेश बाणखेले
श्री. आदिनाथ मुंगसे
श्री. अमित पठारे
सौ. कांताबाई गढेकर
सौ. आशा धोत्रे
कु. मोनिका पठारे